Festivals 2 min read मर

संकष्ट चतुर्थी

संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

चैत्र कृष्ण चतुर्थी, शक १९४६, दिनांक 27 एप्रिल 2024, शनिवार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.

संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

गणेशाची नावे

संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

**लंबोदर** - ज्याच्या उदरातून अनंतकोटी ब्रह्मांड जन्माला येतात.

ज्याच्या उदरातच ती खेळतात आणि अंती ज्या उदरातच ती लुप्त होतात.

त्या अनंत कोटी ब्रह्मांडरूपी उदरधारीला शास्त्रकार लंबोदर रूपात आळवतात.

**धूम्रवर्ण** - धूम्र म्हणजे धूर, धूर समोर असला की पैलतीराचे काही दिसत नाही.

यथार्थ स्वरूप कळत नाही आणि वर्ण म्हणजे त्वचेचा रंग, अर्थात सर्वात बाह्य बाब.

प्रथमदर्शन बाह्यतमरूप आणि ज्या गणराजांचे बाह्यरूपही, अगदी ईश्वर महेश्वरांनाही नेमके दिसत नाही.

ज्यांचे यथार्थ रूप त्यांनाही सहज कळत नाही.

त्यापरमगूढतत्वास म्हणतात धूम्रवर्ण.

**विकट** - शास्त्रकार 'कट' शब्द वेडेवाकडे या अर्थी योजतात.

आणि वेडीवाकडी असते माया.

ही माया ज्यांच्यापासून

**वि** - गत अर्थात दूर झाली असते त्या परब्रह्मास विकट म्हणतात.

**विघ्ननायक** - संकलविघ्नांचा अधिपती.

खरे विघ्न आहे हा भवबंध.

हा संसार.

हा भवसागर, त्याच्यावर ज्याची सत्ता चालते तो विघ्ननायक.(

**संदर्भ** - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा.

स्वानंद गजानन पुंड)

चंद्रोदय वेळा

काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे27 एप्रिल 2024,

**शनिवार** - संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय २२:१२अकोला २१:५९जबलपूर २१:५३पुणे २२:०६रांजणगांव २२:०५अमरावती २१:५६जळगांव २२:०५पुळे २२:०५लातूर २१:५५अलिबाग २२:११जालना २२:०१बीड २१:५९वडोदरा २२:१९अहमदनगर २२:०४ठाणे २२:१२बीदर २१:५०वर्धा २१:५२अहमदाबाद २२:२३धारवाड २१:५४बुलढाणा २२:०२विजयपूर २१:५४इंदूर २२:०८धाराशिव २१:५६बेंगळूरु २१:३७वेंगुर्ले २२:०१ओझर २२:१२धुळे २२:०९बेळगांवी २१:५७छ.

संभाजीनगर २२:०४कलबुर्गि २१:५१नांदेड २१:५३भंडारा २१:४९सांगली २१:५९कल्याण २२:११नागपूर २१:५१भुसावळ २२:०५सातारा २२:०४कारवार २१:५६नाशिक २२:१०भोपाळ २२:०४सावंतवाडी २२:००कोल्हापूर २२:००पंढरपूर २१:५८महड २२:०९सिद्धटेक २२:०३गदग २१:५१पणजी २१:५९मोरगाव २२:०३सोलापूर २१:५६गोकर्ण २१:५५परभणी २१:५६यवतमाळ २१:५३हुब्बळ्ळी २१:५३ग्वाल्हेर २२:०९पाली २२:०९रत्नागिरी २२:०५हैदराबाद २१:४४