Festivals मर

संकष्ट चतुर्थी 28 फेब्रुवारी 2024

संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.

संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

गणेशाची नावे

संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...१.

गणेश्वर - भगवान श्रीगणेशांच्या अनेक नामांमध्ये 'गण' शब्दाचा समावेश आहे.

गणपती रूपातच आपण त्यांना ओळखतो.

मात्र या गण शब्दाचा अर्थ काय? सामान्यतः आपण गण म्हणजे शिवगण समजतो.

पण इतका सामान्य अर्थ नाही.

एका साध्या प्रश्नाचा विचार करा.

जर श्रीगणेश केवळ शिवगणांचे प्रमुख असते तर शैवांसह शाक्त, वैष्णव, सौर इ.

सर्वच पंथोपपंथांचे उपासक त्यांची उपासना करताना दिसतात, याचाच अर्थ 'गण' चा काही वेगळाच अर्थ आहे.

संस्कृतचा नियम आहे. 'शब्दानां धातूनाम् अनेकार्थाः।' अर्थात शब्दांचे तथा धातूंचे अनेक अर्थ असतात. 'गण' शब्दाचेही असेच अनेकानेक अर्थ आहेत.

— पारंपरिक

प्रत्येक शास्त्रानुसार तो अर्थ वेगळा आहे.

ज्योतिषशास्त्रात गण शब्द देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या स्वरूपात येतो.

जन्मलेला प्रत्येक जीव नक्षत्रानुसार या गटात विभक्त होतो अर्थात समस्त जीवांनाच तेथे 'गण' शब्दात समाविष्ट केले जाते.

गणितशास्त्रानुसार 'गण' अर्थात संख्या, अर्थात जे काही मोजता येते त्यास गण म्हणतात.

धर्मशास्त्रात गण शब्दाचा अर्थ पंथ असा आहे.

अर्थात ज्या ज्या मार्गाने लोक उपासना करतात त्या पद्धतीने चालणाऱ्यांस गण म्हणतात.

व्याकरणात गण शब्द धातूंच्या समूहाला योजतात.

धातू अर्थात क्रियेचे मूळ रूप, पर्यायाने सर्व क्रिया आणि त्याद्वारे क्रियारत चैतन्य गण ठरते.

वृत्तशास्त्रानुसार गणवृत्त या अर्थाने, रत्नशास्त्रात राशी या अर्थी तर सैन्यशास्त्रात तीन गुल्म सेनेला गण म्हणतात, समाजशास्त्रात कार्यकर्त्यांना गण म्हणतात.

बोलीभाषेत 'मनातील खरा हेतू' या अर्थाने गण शब्द योजिला जातो, साधूंच्या समुदायास जैनवाङ्मय गण म्हणते. 'गण' शब्दाचे असे अनेक अर्थ आहेत आणि यातील कोणत्याही गणांचा पती या अर्थाने श्रीगणेश सर्वांचेच अधिपती आहेत.

सर्वाधीश आहेत.

या सगळ्या अर्थांच्या पार श्रीमुद्गलपुराणाने गण शब्दाचा नेमका सर्वव्यापक अर्थ सांगितला.

गकाररूपेण भवान्सगुणौ णकाररूपेणच निर्गुणोऽसि ।

— पारंपरिक

तयोरभेदे गणनाथ नामा योगेशभक्तेश नमो नमस्ते ।

— पारंपरिक

ग अर्थात सगुण तथा ण अर्थात निर्गुण.

या सगुणनिर्गुणाच्या अभेदत्वाचे नाव आहे 'गण'.

त्यांचा ईश्वर अर्थात दोन्हीतही ज्यांचीच सत्ता आहे.

जे सगुण आहेत.

तेच निर्गुण आहेत.

तेच श्री गणेश्वर आहेत.२.

गणक्रीडा - समस्त गणांशी क्रीडा करतात.

लीला करतात ते.३.

गणनाथ - समस्त गणांचे नाथ.

सगुणनिर्गुण, दृश्यअदृश्य सर्वांचे संचालक, स्वामी.४.

गणाधिप - या सर्व गणांवर ज्यांची अधिसत्ता चालते ते.

असा हा गणांचा अधिपति आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो.

चंद्रोदय वेळा

काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे28 फेब्रुवारी 2024,

बुधवार - संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय २१:४९

अकोला - २१:३३

गोकर्ण - २१:३९

पाली - २१:४७

रत्नागिरी - २१:४५

अमरावती - २१:३०

ग्वाल्हेर - २१:३३

पुणे - २१:४४

रांजणगांव - २१:४३

अलिबाग - २१:४८

जबलपूर - २१:२३

पुळे - २१:४५

लातूर - २१:३३

अहमदनगर - २१:४१

जळगांव - २१:३९

बीड - २१:३७

वडोदरा - २१:५०

अहमदाबाद - २१:५३

जालना - २१:३७

बीदर - २१:२८

वर्धा - २१:२६

इंदूर - २१:३९

ठाणे - २१:४८

बुलढाणा - २१:३६

विजयपूर - २१:३५

धाराशिव - २१:३५

धारवाड - २१:३७

बेंगळूरु - २१:२४

वेंगुर्ले - २१:४३

ओझर - २१:४६

धुळे - २१:४२

बेळगांवी - २१:३९

सांगली - २१:४०छ.

संभाजीनगर - २१:३९

नांदेड - २१:३०

भंडारा - २१:२२

सातारा - २१:४३

कलबुर्गि - २१:३१

नागपूर - २१:२४

भुसावळ - २१:३८

सावंतवाडी - २१:४२

कल्याण - २१:४८

नाशिक - २१:४५

भोपाळ - २१:३३

सिद्धटेक - २१:४०

कारवार - २१:४०

पंढरपूर - २१:३७

महड - २१:४७

सोलापूर - २१:३५

कोल्हापूर - २१:४१

पणजी - २१:४२

मोरगाव - २१:४२

हुब्बळ्ळी - २१:३६

गदग - २१:३४

परभणी - २१:३३

यवतमाळ - २१:२८

हैदराबाद - २१:२४410410 views00 commentsPost not marked as liked