गणेशाची नावे
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
- नन्दन - आनंदप्रदायक, सकलसुखदाता.
- अलम्पट - अलम् म्हणजे परिपूर्ण, भरपूर. पट म्हणजे वस्त्र अर्थात् वस्त्रप्रावरण समृद्ध. लम्पट म्हणजे मागे लागणारा अर्थात् कशाची तरी हाव असणारा. अलम्पट अर्थात कशाचीही इच्छा नसणारा, परिपूर्ण. आत्मपूर्ण.
- अभीरू - भय हे नेहमी आपल्यापेक्षा अधिक शक्तिशालीचे असते आणि गणनाथ सर्वोच्च सत्ता असल्याने तो अभीरू असतात.
- मेघनाद - ज्यांचा ध्वनी मेघाप्रमाणे 'घनगंभीर' आहे असे.
- गणंजय - सकल शत्रू गणांवर विजय प्राप्त करणारे. त्यांना जिंकणारे, अन्तःस्थित कामक्रोधादि विकारांना वश करून ठेवणारे ते गणंजय.
Moonrise Times - 21 सप्टेंबर 2024, शनिवार
Moonrise times for major cities on Sankashti Chaturthi:

