यावर्षी शक १९४६ मध्ये 31 अक्टोबर 2024 रोजी चतुर्दशी समाप्ति १५:५३ असून त्यानंतर अमावास्या सुरु होत आहे आणि दुसरे दिवशी 1 नोवेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी १८:१७ वाजता अमावास्या समाप्ति आहे.31 अक्टोबर रोजी प्रदोषकाळात अमावास्येची अधिकव्याप्ति असून दुसरे दिवशी 1 नोवेंबर रोजी शुक्रवारी अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असताना 1 नोवेंबर रोजी लक्ष्मीपूजन दिले आहे.
धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणि, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इ.
ग्रंथांमधील वचनांचा विचार करून दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावास्येची
**कमी** - अधिक व्याप्ती असता दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे.
परदिने एव दिनद्वयेपि वा प्रदोषव्याप्तौ परा।
पूर्वत्रैव प्रदोषव्याप्तौ लक्ष्मीपूजनादौ पूर्वा। (धर्मसिंधु)इयं प्रदोषव्यापिनी ग्राह्या, दिनद्वये सत्त्वाऽसत्त्वे परा। (तिथिनिर्णय)यदा सायाह्नमारभ्य प्रवृत्तोत्तरदिने किंचिन्न्यूनयामत्रयम् अमावास्या तदुत्तरदिने यामत्रयमिता प्रतिपत्तदाऽमावास्याप्रयुक्त दीपदानलक्ष्मीपूजादिकं पूर्वत्र ।
यदा तु द्वितीयदिने यामत्रयममावास्या तदुत्तरदिने सार्धयामत्रयं प्रतिपत्तदा परा । (पुरुषार्थ चिंतामणि)अर्थात् अमावास्या तीन प्रहरानंतर संपत असेल आणि प्रतिपदा साडेतीन प्रहरानंतर संपत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनादि करावे.
प्रदोषकाळात अमावास्येची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायाह्नकाळी व प्रदोषकाळी अमावास्या मिळत आहे.
तसेच अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे.
युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्याने, या सर्व वचनांची संगती लावून आम्ही 1 नोवेंबर 2024 रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे.
या दिवशी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोष काळात अल्पकाळ असली तरी सायाह्न काळापासून प्रदोषकाळ समाप्ती पर्यंत (म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत) नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.
यापूर्वी 28-10-1962, 17-10-1963 आणि 2-11-2013 रोजी यावर्षी प्रमाणेच अमावास्या प्रदोषात अल्पकाळ असताना अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले होते.
वरील उल्लेखित ग्रंथांमधील वचनांचा आणि जुन्या पंचांगातील निर्णयांचा विचार करुन 1 नोवेंबर 2024 ला शुक्रवारी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे.1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन देणारी महाराष्ट्रातील काही प्रमुख पंचांगेदाते पंचांगासह कालनिर्णय पंचांग (मुंबई), महालक्ष्मी पंचांग (कोल्हापूर), महाराष्ट्रीय पंचांग (नागपूर), स्वामी समर्थ पंचांग (डोंबिवली), निर्णयसागर पंचांग (ठाणे), सोमण पंचांग (ठाणे), श्रीस्वामी गादी पंचांग (मुंबई)1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन देणारी भारतातील काही प्रमुख पंचांगेराजस्थान मधीलमध्यप्रदेश मधीलइतर प्रदेशातीलअर्बुद श्री पंचांग, जावालश्री भादवमाता पंचांग, नीमचश्री काञ्ची आचार्य श्रीमठ पंचांग, (कांचीपुरम्)सनातन ज्योतिष पंचांग, सुमेरपूरबद्रिकाशी पंचांग, अशोक नगरश्री व्यास पंचांग, गुजरातश्री चंडमार्तंड पंचांग, जोधपूरश्री शिवपंचांग, विदिशासंदेश पंचांग, गुजरातज्योतिष सम्राट पंचांग, जयपूरदैवज्ञ प्रबोध पंचांग, भिंडश्री ब्रजभूमि पंचांग, मथुराश्री मेवाड विजय पंचांग, उदयपूरपुष्पांजली पंचांग, भोपाळश्रीराजधानी पंचांग, दिल्लीश्री जय मार्तंड पंचांग, जयपूरसिध्देश्वर पंचांग, अवंतिकापप्पी पंचांग, दिल्लीसवाई जयपुर पंचांग, जयपूरसिद्धविजय पंचांग, उज्जैनमार्तंड पंचांग, कुराली (पंजाब)शेखावाटी पचार पंचांग, सीकरनिर्णयसागर पंचांग, नीमचपंचांग दिवाकर, जालंधर (पं.)ज्योतिष सम्राट कालदर्शक, जयपूरकालचक्र पंचांग, राजोदकैलाश पंचांग, हरियाणाअखिल भारतवर्षीय पंचांग, जयपूरअवंतिका पंचांग, उज्जैनगणकानंद दृक गणित पंचांग, कडपा (आंध्रप्रदेश)तिथिप्रधान छ: न्याति पंचांग, बिकानेरनिर्णयसागर कालदर्शक पंचांग, दाते पंचांग, कर्नाटककिशोर जंत्री, जयपूरसियाभवानी पंचांग, सागरपरमेश्वरी पंजिका, ओडिसाकिशोर कालचक्र, जयपूरधूतपापेश्वर पंचांग, उज्जैनभाग्यज्जोति श्रीक्षेत्र पंजिका, (ओ.)श्रीधर शिवलाल पंचांग, किशनगढश्री विक्रमादित्य पंचांग, उज्जैनसमंत चंद्र शेखर पंजिका, ओडिसाश्री साकेत पंचांग, बूंदीउत्तराखंड मधीलश्री देव पंचांगम्, रायपूर (छ.)अपराजिता पंचांग, बूंदीश्रीताराप्रसाद दिव्य पंचांग, नैनितालश्रीनिवासन् पंचांगम्, सेलं (ता.)श्रीधरी कालदर्शक पंचांग, किशनगढनक्षत्र लोक तिथि पंचांगपांबु पंचांगम्, तंजावूर (ता.)श्री गुरुधाम पंचांग, सालसरश्रीगणेश मार्तण्ड पंचांग, नैनितालगृहस्थ दर्पण पंचांग, कोलकाता (प.
बंगाल)श्री शिवशक्ति पंचांग, जोधपूरमहीधरी कीर्ति पंचांग, गढवालपं.
बंशीधर ज्योतिष पंचांग, जयपूरश्री पीताम्बरा पंचांग, ऋषिकेशश्री सिद्धिदात्री पंचांग, ऋषिकेशवरील यादीतील पंचांगांखेरीज भारतातील इतर अनेक पंचांगांमध्ये देखीललक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दिलेले आहे.
**टीप** - गेल्या काही वर्षांपासून सोशल मिडियाचा वापर करून काहीजण ऐन सणाच्या वेळेस संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
लक्ष्मीपूजनाचे बाबतीत देखील गणित पद्धतीमधील फरकामुळे आणि काही जणांनी धर्मशास्त्रीय वचनांचा योग्य अर्थ न लावल्यामुळे 1 नोव्हेंबर ऐवजी अन्य दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले असण्याची शक्यता आहे.
तरी अशा कुठल्याही मेसेजमुळे, कुठल्याही अफवांमुळे संभ्रमित न होता परंपरेप्रमाणे आपण ज्या पंचांगाचा / कॅलेंडरचा वापर करता त्याप्रमाणेच लक्ष्मीपूजन करावे, संभ्रमित होऊ नये.Tags:Hindu FestivalDiwaliDipavaliLaxmi PoojanSan Vratyearly13711,371 views00 comments3 likes. Post not marked as liked3