Festivals 3 min read मर

संकष्ट चतुर्थी

कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

फाल्गुन कृष्ण ४, शक १९४५ - 28 मार्च 2024कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.

संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

गणेशाची नावे

संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

**एकदंष्ट्र** - सामान्य अर्थाने एकदन्त शब्द आपण श्रीगणेशांचा एक दात तुटला असल्याने योजतो.

पण इतका सामान्य अर्थ अभिप्रेत नाही.

शास्त्रकार एक शब्द मायेसाठी योजितात.

अजामेकां असे तिचे वर्णन येते.

तर दन्त हा शब्द सत्ता या अर्थी येतो.

अर्थात मायेवर ज्याची सत्ता चालते त्या परब्रह्मास एकदंत म्हणतात.

**वक्रतुण्ड** - व्यावहाहिक अर्थाने या नामाचा अर्थ 'विचित्र मुखाचा' असा होतो.

कोणी श्रीगणेश सोंड वळवतात म्हणून ते वक्रतुंड असा अर्थ करतात.

पण सोंड हे हत्तीचे तोंड नसून नाक असते.

मग वक्रतुंड नामाचा अर्थ काय? वक्र शब्द शास्त्रकार मायेसाठी योजतात.

तर तोंडाने अर्थाने फुंकरीने जे मायेचा नाश करतात, मायापटलध्वस्त करतात ते परमेश्वर वक्रतुंड ठरतात.

तर एक अर्थ वक्रान् तुंडयति म्हणजे जो वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांना दंड करतो, त्यांना सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.

**गजवक्त्र** - गजमुखाचा अर्थ केवळ हत्तीचे मस्तक इतका सामान्य नाही.

ते प्रतीक आहे. 'गज' शब्दात ग आणि ज असे दोन वर्ण आहेत जे उलटवले की 'जग' शब्द तयार होतो.

सगुण साकार सावयव दुःखपूर्ण असे ते 'जग'.

त्याच्या विपरीत अर्थात निर्गुण निराकार निरवयव आनंदरूप ते 'गज' आणि याच रूपात ज्याला ओळखता येते ते परब्रह्म आहे

**गज** - मुख.

मुख म्हणजे ओळख.

निर्गुण हीच ज्यांची ओळख ते गजवक्त्र.

**महोदर** - केवळ मोठ्या पोटाचा इतका सामान्य अर्थ नाही.

जो परमात्मा सगळ्यांच्या उदरात राहून समस्त भोगांचा आस्वाद घेतो.

मात्र ज्याच्या आत कोणी नसते अर्थात ज्यापेक्षा अधिक सूक्ष्म तत्व काहीही नसते त्यांस श्रीमहोदर असे म्हणतात.(

**संदर्भ** - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा.

स्वानंद गजानन पुंड)

चंद्रोदय वेळा

काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे28 मार्च 2024,

**गुरुवार** - संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय २१:२७

**अकोला** - २१:१२

**गोकर्ण** - २१:१४

**पाली** - २१:२४

**रत्नागिरी** - २१:२२

**अमरावती** - २१:०९

**ग्वाल्हेर** - २१:१७

**पुणे** - २१:२२

**रांजणगांव** - २१:२०

**अलिबाग** - २१:२६

**जबलपूर** - २१:०४

**पुळे** - २१:२२

**लातूर** - २१:१०

**अहमदनगर** - २१:१९

**जळगांव** - २१:१९

**बीड** - २१:१५

**वडोदरा** - २१:३०

**अहमदाबाद** - २१:३४

**जालना** - २१:१५

**बीदर** - २१:०६

**वर्धा** - २१:०६

**इंदूर** - २१:२०

**ठाणे** - २१:२७

**बुलढाणा** - २१:१५

**विजयपूर** - २१:११

**धाराशिव** - २१:१२

**धारवाड** - २१:१२

**बेंगळूरु** - २०:५८

**वेंगुर्ले** - २१:१८

**ओझर** - २१:२५

**धुळे** - २१:२२

**बेळगांवी** - २१:१५

**सांगली** - २१:१६छ.

**संभाजीनगर** - २१:१८

**नांदेड** - २१:०८

**भंडारा** - २१:०२

**सातारा** - २१:२०

**कलबुर्गि** - २१:०७

**नागपूर** - २१:०४

**भुसावळ** - २१:१८

**सावंतवाडी** - २१:१८

**कल्याण** - २१:२६

**नाशिक** - २१:२४

**भोपाळ** - २१:१५

**सिद्धटेक** - २१:१८

**कारवार** - २१:१५

**पंढरपूर** - २१:१४

**महड** - २१:२५

**सोलापूर** - २१:१२

**कोल्हापूर** - २१:१७

**पणजी** - २१:१७

**मोरगाव** - २१:१९

**हुब्बळ्ळी** - २१:११

**गदग** - २१:०९

**परभणी** - २१:११

**यवतमाळ** - २१:०७

**हैदराबाद** - २१:०१Tags:GaneshaGanapatiChaturthiSankashtChaturthiMoraya