Festivals 2 min read मर

रथसप्तमी, सूर्योपासनेचा दिवस

माघ शुक्ल सप्तमीस रथसप्तमी असे म्हणतात. या दिवशी सात घोड्यांचा रथ व त्यावर अरुणासह आरूढ असलेल्या सूर्याची पूजा केली जाते.

रथसप्तमी, आरोग्य सप्तमी, जागतिक सूर्यनमस्कार दिन आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशून् वसूनि च ।

— पारंपरिक

ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ।।

— पारंपरिक

आयुष्य, आरोग्य, यश, संतति, संपत्ति, ज्ञान, प्रज्ञा, मेधा याची प्राप्ती सूर्य देवते पासूनच होते त्यामुळे हे वनस्पते (सूर्य देवा) आम्हाला तुझ्या कृपेने हे सर्व प्राप्त होवो.

सर्वच प्राणिमात्रांना सूर्यापासूनच चैतन्य मिळते.

त्याच्या प्रकाशाने आरोग्य आणि धान्यादी वस्तू मिळतात.

पर्जन्यवृष्टीही त्याच्यावरच अवलंबून असते.

अशा या देवतेची उपासना मानव प्राचीन कालापासून करीत आला आहे.

ऋग्वेदात सूर्याची बरीच सूक्ते आहेत.

सूर्योपासना हे पूर्वी नित्य कर्मच होते.

सर्वच सप्तमी व्रते ही सूर्याचीच आहेत, त्यात माघ शुक्ल सप्तमी ही सर्वांत महत्त्वाची होय.

माघ शुक्ल सप्तमीस रथसप्तमी असे ही म्हणतात.

सात घोड्यांचा रथ व त्यावर अरुणासह आरूढ असलेल्या सूर्याचे चित्र काढून खालील मंत्राने सूर्याचे ध्यान करून त्याची पूजा केली जाते.

ध्यानाचा

**मंत्र** - ॐ ध्येयः सदा सवितृमण्डल मध्यवर्ति नारायणः सरसिजासन्संनिविष्टः ।

— पारंपरिक

केयूरवान मकरकुण्डलवान किरीटी हारी हिरण्मयवपुधृतशंखचक्रः ॥गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या भांड्यांत खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखविला जातो.

सप्त धान्ये, सात रुईची पाने, सात बोरे सूर्याला वाहिली जातात.

आरोग्यप्राप्ती हे या व्रताचे फल सांगितले आहे.

सूर्याच्या सामर्थ्याविषयी निरनिराळ्या समजुती आहेत.

सूर्य हृदयाशी संबंधित आजार आणि श्वेतकुष्ठ दूर करतो असे उल्लेख ग्रंथात दिसून येतात.

📖

पुराणातील कथा

याबाबत एक कथा प्रसिद्ध आहे.

पूर्वी कंबोज देशात यशोवर्मा नावाचा राजा होता.

त्याला वृद्धापकाळी मुलगा झाला.

तो जन्मतःच रोगी होता.

राजाने रथसप्तमीस सूर्यपूजा केली व त्याच्या पुण्याने मुलगा रोगमुक्त झाला.

म्हणून यास आरोग्य सप्तमी असे देखील म्हणले जाते.

जागतिक सूर्य नमस्कार दिनरथसप्तमीचा दिवस हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो.

खाली दिलेली सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार घालावेत.

सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असून नियमित सूर्यनमस्कार घातल्याने आरोग्य प्राप्ती होते.ॐ ध्येयः सदा सवितृमण्डल मध्यवर्ति नारायणः सरसिजासन्संनिविष्टः ।

— पारंपरिक

केयूरवान मकरकुण्डलवान किरीटी हारी हिरण्मयवपुधृतशंखचक्रः ॥हा मंत्र म्हणून सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात करावी.

सूर्याची १२ नावे – ॐ मित्राय नमः।, ॐ रवये नमः।, ॐ सूर्याय नमः।, ॐ भानवे नमः।, ॐ खगाय नमः।, ॐ पूष्णे नमः।, ॐ हिरण्यगर्भाय नमः।, ॐ मरीचये नमः।, ॐ आदित्याय नमः।, ॐ सवित्रे नमः।, ॐ अर्काय नमः।, ॐ भास्कराय नमः।, ॐ श्रीसवितृसूर्यनारायणाय नमः।

— पारंपरिक

सूर्य नमस्कार घालून झाल्यावर खालील मंत्र म्हणून सूर्याचे तीर्थप्राशन केले जाते.

आदितस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।

— पारंपरिक

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥Tags:Hindu Festival#CulturalTradition#SunFestival#SuryaNamaskar#yogaSan VratArogya257257 views00 comments3 likes. Post not marked as liked3